• Wed. Nov 30th, 2022

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत्त वाहिनी

खोट्या ट्विटर अकाऊंट मुळे झाला करोडो चा तोटा इली लिली या औषध बनवणाऱ्या कंपनी चे शेअरे चे भाव खोट्या ट्विट मुळे घसरले व झाला करोडो चा तोटा

Byसंपादक

Nov 14, 2022

एलोन मस्क यांनी काही दिवसा पूर्वी ट्विटर या सोशल मीडिया साधन असलेली कंपनी विकत घेतली आणि झपाट्याने बदल घडवुन आणले, 50% लोकांना कामावरून कमी केलं, तसेच ट्विटर चा verified असलेली निळी खून 8 डॉलर ला विकण्यास सुरुवात केली.

त्या मुळे खोटे अकाऊंट धारकांनी ही निळी खून जी सत्य माहिती पुरविणाऱ्या अकाऊंट ची सूचक असल्या मुळे विकत घेतल्या.

अश्याच एका खोट्या ट्विटर अकाउंट ने अशी निळीखून विकत घेउन स्वतः एली लिली या कंपनी चे अधिकृत अकाऊंट असल्या चे भासवले.

तसेच या अकाऊंट वरून एली लीली या कंपनी स आर्थिक नुकसान झाल्या चे ट्विट करून भासविले.

याचा परिणाम असा झाला की एली लिली या औषध बनवणाऱ्या कंपनी चे शेअर चे भाव बाजारात धडाधड कोसळले, व एली लिली कंपनी ला खुप मोठं आर्थिक नुकसान झेलव लागलं आहे.

एलोन मस्क हे टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनी चा मालक आणि स्पेस एक्स या अंतराळ यात्रा सुरू करणाऱ्या कंपनी चा मालक आहे व जगातील श्रीमंत इसम आहे.

असे असले तरी काही वेळेस घाई घाई मधे घेतलेले निर्णय भारी पडतात, याची प्रचिती आली आहे, अशे बरेचं प्रकार ट्विटर अकाऊंट बाबत रिपोर्ट करण्यात आले आहेत.

मजेची गोष्ट म्हणजे स्वतः एलोन ने सुद्धा आपली चुक कबूल केली आहे आणि ती कशी सुधारता येईल याचा वर विचार करत आहे.