• Tue. Nov 29th, 2022

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत्त वाहिनी

हिमोफिलिया बी साठी अमेरिके च्या अन्न आणि औषध प्रशासनाने जगातील पहिली ट्रीटमेंट जीन थेरपी gene Therapy ला मान्यता दिली

हिमोफिलिया बी म्हणजे काय? हिमोफिलिया बी ग्रस्त रूग्णांना शरीराच्या कोणत्याही भागातून शरीराच्या आतून किंवा कोणत्याही इजा झालेल्या किंवा जखमी झालेल्या भागातून अनियंत्रित रक्तस्त्राव होतो. काही वेळा अंतर्गत अवयव किंवा तोंडा मधून कोणत्याही जखमे शिवाय किंवा कट शिवाय रक्तस्त्राव होतो. हिमोफिलिया बी heamophillia ची लक्षणे: हिमोफिलिया बी बाधित रुग्णांना कारण नसताना सांधे, मांसपेशी, पोट आणि नाकातून, हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, त्वचेवर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर थोडासा ओरखडा पडला तरीही रक्तस्त्राव होतो. शस्त्रक्रिया हा एक मुद्दा आहे जिथे रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. हिमोफिलिया बी वर उपचार:हिमोफिलिया बी साठी कोणते उपचार उपलब्ध आहेत ? हिमोफिलिया बी रूग्णांना फॅक्टर IX चे इंजेक्शन किंवा इंट्राव्हेनस डोस दिले जातात, जे यूएस एफडीएने नवीन जीन थेरपी औषधासाठी मान्यता देण्यापूर्वी कालपर्यंत उपचार उपलब्ध होते. फॅक्टर IX इंट्राव्हेनस डोस देणे आवश्यक असते, ज्याप्रमाणे मधुमेहाच्या रूग्णांना इन्सुलिनची आवश्यकता असते, त्याच प्रकारे हिमोफिलिया बी ग्रस्त रूग्णांना फॅक्टर IX डोस देणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना रक्तस्त्राव होणार नाही. हिमोफिलिया बी कश्या मुळे होतो? हिमोफिलिया बी ही एक रोग स्थिती आहे जी सदोष जनुका (Defective Gene) मुळे उद्भवते ज्यामध्ये शरीरात Factor IX तयार होत नाही Factor IX रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी जबाबदार असतो. रक्त जखमेतून वाहणार रक्त वेळीच गोठलं नाही तर रक्त वाहू लागते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी, फॅक्टर IX च्या अभावी जखम झालेल्या मांसपेशी मधून अनियंत्रित रक्तस्त्राव होतो, कारण रक्त वेळीच गोठत नाही. हिमोफिलिया बी रूग्णांमध्ये कधीकधी रक्तस्त्राव उत्स्फूर्त असतो, आतील अवयव, आतडे किंवा तोंडातून, नाकातून कोणत्याही ठिकाणी होऊ शकते. हिमोफिलिया बी हा X गुणसूत्राशी संबंधित आजार आहे, जो मुख्यतः पुरुषांना होतो, काही महिलांनाही हिमोफिलिया बी चा त्रास होतो, रुग्णांमध्ये IX घटक निर्माण करणारे जनुक Gene नसते.हिमोफिलिया बी प्रौढ रूग्णांवर उपचार करण्यासाठी यूएस FDA द्वारे मान्यताप्राप्त अशा प्रकारची पहिली नवीन औषध जीन थेरपी.US FDA ने मंजूर केलेले हे अशा प्रकारचे पहिले औषध आहे, ही एक जीन थेरपी आहे, जीन थेरपी औषधा चे नाव हेमजेनिक्स आहे त्याला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन यांनी US FDA ने 22-11-2022, रोजी प्रौढ हिमोफिलिया बी रूग्णांच्या उपचारासाठी मान्यता दिली आहे.

For detail update on Hemophilia B treatment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *