• Mon. Apr 29th, 2024

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत वाहिनी

विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड च्या नेरळ गृह प्रकल्पात 356 घर खरेदीदारांना 8 वर्ष पैसे देउन सुध्दा घरं मिळाली नाहीत

Bythanesamachar

Feb 4, 2024

ठाणें:  दिनांक 04 फेब्रुवारी 2024

ठाणें येथिल एके काळच्या नावाजलेल्या विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कंपनी च्या नेरळ येथे 356 लोकांनी घर खरेदी साठी जवळ जवळ सर्व पैसे देउन सुध्दा जवळ जवळ 8 वर्ष 356 लोकांना आजुन घरं मिळाली नाहीत.

विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड या कंपनी ने घेतलेली कर्ज वेळेत परत फेड केली नाही म्हणुन L & T तसेच आदित्य बिर्ला कंपनी ने कर्ज वसुली सुरू केली त्या मुळे जवळ जवळ 70% इमारती तयार झालेला गृह प्रकल्प विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कंपनी ने अर्ध्या वर सोडुन दिवाळखोरी घोषित केली.

या गृह प्रकल्पात घरं घेणारी मंडळी मधे रिटायर्ड व वृद्धांची संख्या जास्त अहे आसे समजते, वृध्द वयात जुनी रहाती घरं विकुन काही जणांनी नेरळ येथिल गृह प्रकल्पात घरं विकत घेतली आहेत, आणि आता ही मंडळी हवालदील झाली आहे.

NCLT कोर्टाने विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कंपनी वर दिवाळखोरी घोषित करून कॉर्पोरेट इन्सोलवानसी रेसोलिशन प्रक्रिया सुरू आहे. यावर पुढील कारवाई करून घर खरेददारांना घरं द्यावीत असं मत सर्व घर खरेदीदरांच आहे असं मत प्रस्तावित होम बायर्स असोसिएशन चें चेअरमन श्री चंद्रकांत दांडेकर यांनी व्यक्त केलं.